Monday, January 30, 2012


माझ्या सारख्या एका मुलाची कथा
७ वी ला असताना …

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी “बेस्ट फ्रेंड ” होती …
मला ती खरच खूप आवडायची I
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत….
वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
“माहित नाही का…..??” :( ((

कॉलेग ला असताना

माझ्या फोन वर call आला…
तिचाच होता तो …
ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती
आणि ती मला सांगत होती तिच ज्याच्या वर प्रेम होता त्याने कसा त्रास दिला तिला…
तिने मला भेटायला बोलवलं होत
मी तिला भेटायला गेलो…
मी तिच्या समोरचं बसलो होतो
मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो…
२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं…
मी तिच्या साठी आणि माझ्या साठी चित्रपटाची तिकीट काढली…
पण तिने मला म्हटलं मी झोपते..
तिने म्हटलं “बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास…”
खूप वेळा शांत उभे होतो…
मग मी निघालो…
आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे …
माहित नाही का???
.

सिनियर वर्षाला

आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडी त जायचं
ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली…
माझ्या सोबत कोणी नाही आहे… तू माझ्या सोबत येशील…
माझ्या सोबत हि कोणी नव्हत…
आम्ही दोघांनी “बेस्ट फ्रेंड्स ” ह्या नात्याने जाण्याचा नित्नय घेतला …

PROM NIGHT ला …

PROM NIGHT ला सगळ काही नीट झाल..
आम्ही दोघे निघालो… मी तिची वाट पाहत होतो…
ती तेवढ्यात आली… तिने माझ्या कडे बघून एक smile दिली
आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..
पण मी खुश होतो… कि ती खुश आहे…

GRADUATION DAY ला …

दिवसा मागून दिवस गेले…
आठवडे लोटले किती तरी महिने गेले
तिला काही बोलण्या आधीच graduation day आला …
मी तिला पाहिलं …
तीने साडी नेसली होती… खूप छान दिसत होती..
माझा तिच्या वर एका तर्फी प्रेम होत पण काय करणार तेच जमत नव्हत ना
आमची शेवटची भेट होणार होती…
ती समोरून आली… मला तर काही बोलताच आलं नाही…
तिने माझ्या चेहर्या वरून हात फिरवला …
आणि म्हटली “आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे..”
बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला

काही वर्षांनी

मी लग्नात आलो होतो…
आणि ते लग्न होत तीच .. तिचा दुसर्या सोबत लग्न ठरलं होत ..
माझं प्रेम कधी व्यक्त चा नाही करता आलं…पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेव्हा निभावल….
“तू आज हि माझ्या सोबत आहेस ” असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..
आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..

खूप वर्षांनी…
मी आमच्या शाळेत एकदा गेलो …
तिथे आमच्या वर्गातले सगळे जण आले होते…
ती हि…
तिथे प्रत्येकाने आपली लहान पाणी लिहिलेली पत्र ठेवली होती…
मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं… आणि वाचायला लागलो…
7th:”वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो… किती वेडा आहे हा मुलगा “
college year:”आज हि मी त्याला खोत सांगितलं कि माझं ब्रेअक उप झाला तरी हा वेडा माझ्या साठी आलं “
prom night”आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे …. मी वाट बगहातेय,…
मला त्याला सांगावस वाटतंय कि माझा हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे…”
graduation year:”किती लाजाळू आहे हा साडीत पाहून नाही काही बोलला नाही “
marriage day:”आज माझा लग्न आहे… माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील…..”

Saturday, January 28, 2012

क्षणभंगुर .....


तो अजूनही झोपलेलाच होता.
वर टांगलेली सलाईन वार्यानीशी हलत होती।
त्यातून टपकणारे थेँब त्याच्या रक्तात भिनत होते।
झोप कसली येत होती त्याला, उघड्या डोळ्यांनी तो एकाच ठिकाणी टक लावून बघत होता।
त्याची आई औषध आणि गोळ्या घेऊन आली।
त्याला थोडेफार खान्याची विनंती केली,पण त्याने नकार दिला। आई गेल्यावर त्याने एका हाताने गोळ्या व औषध घेतली।
तेवढयात घडाळ्याच्या टोलांनी त्याचे लक्ष वेधले।
सहा वाजले होते त्याने चटकन चादर बाजूला केली,
"अरे बापरे! क्लास तर संपून गेला असेल।"
अंगात एवढेही बळ नसतांना त्याने सुईहातातून खचकन खेचली, भळ-भळणार्या रक्तातून कापसाचा बोळा पकडून तो सायकल जवळ गेला। त्याच्याकडे घरातल्या कोणाचेही लक्ष नव्हते
भर पावसात तो क्लासकडे गेला,क्लास तर केव्हाच संपला होता।
थोडीशी पावसाची भूरभूर चालत होती, ती क्लासच्या बाहेर त्याची वाट बघत होती।
त्याला बघितल्यावर तिचे डोळे चमकले,तिला त्याचा राग आला होता, तिने त्याच्या डोक्यावर छत्री धरून त्याचा कान धरला, ॰"तु आजारी असतांना इथे का आलास? आणि पुन्हा छत्री विसरलास"॰
"बापरे! किती पाणी" त्याच्या डोक्यावरचे पाणी झटकत ती म्हणाली.
"पूर्ण ओला झालाय आणि सर्दी झाली म्हणजे मलाच म्हणशील. . . . . . .। अरे ! किती बडबड करते मी? जाऊ दे, बरं डॉक्टर काय म्हणाले, तब्यात कशी आहे"
दोघेही क्लासच्या बाहेरील पायरीवर जाऊन बसले। तो अजूनही कापरत होता। तिच्या डोळ्यांमध्ये त्याचे बावरलेले मन स्वतःची खोलवर प्रतिमा शोधत होते। तिचे ते निरागस डोळे मात्र सदैव त्याच्याच चिंतेत बुडालेले दिसत होते। त्याच्या अतिभोळेपणाची तिला काळजी वाटायची त्या प्रेमाच्या वेडेपणाची सिमा अजून तिलाही ठरवता आली नाही, त्याच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि दचकली।
"बापरे ! किती भयंकर ताप आलाय तुला ?आणि तरी तु एवढ्या पावसात मला भेटायला आला ? तुला काही झाले म्हणजे ? नाही, मीच वेडी आहे ऽ मीच थांबते ना , तु बघच मी थांबतच नाही॥
असं दृष्ट लागण्याजोगं प्रेम पाहून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं। बोलण्याचा प्रयत्न करताच, त्याला खोकला आला। त्याला न बोलण्याची तिने विनंती केली, त्याचाहात आपल्या हातात घेताच तिने हातातून ओघळणारे रक्त बघितले, ती यावेळी मात्र चिडली ॥
"तू हे काय केलंस ? तू स्वतःच सलाईन काढली ना? का स्वतःला त्रास करून घेतोस? तुला होणार्या वेदना काळजात सुईप्रमाणे घुसतात. . . . . जा । मी तुझ्याशी बोलणारच नाही, अरे तुला काही झालं म्हणजे मी आणि माझे जीवन .. . . . . . ."
खरंच इतकं प्रेम करतोस का रे माझ्यावर ? मग का मला असा त्रास देतोस ? तुझ्या वेडेपणानेच मला वेड लावलं तुझं, तुझ्या प्रेमाचं । मी सुदधा इतकी वेडी आहे ना । मी थांबते म्हणून तर तू येतोस, दोघेही वेडे आहोत आपण ॥"
तिने त्याच्या खांदयावर मान टेकवली,तिचे डोके थापटत तो मात्र कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात हरवून गेला होता। जिथे फक्त तिच्या बांगड्यांची किण-किण आणि तिचाच आवाज येत होता ॥
तेवढ्यात त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली,
"काय रे ! काय करतोय इथे एकटा ? एवढ्या पावसात का बसलाय ? घरचे म्हणत होते, तू आजारी आहेस म्हणून॥"
सरांच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने मान डोलावली, सर आत निघून गेले। भरलेल्या डोळ्यांनी किंचीत त्याने मागे वळून पाहीले।
क्लासमध्ये तिच्या फोटोची माळ वार्यानिशी हालत होती । ती क्लासमधील एक हुशार मुलगी होती । सर्व काही दृष्ट लागण्याप्रमाणे घडून गेलं होतं ।। स्वप्नाहूनही सुंदर अशा त्यांच्या दुनियेत काळाने अशी झडप घातली होती की त्याच्या दुनियेतील सर्व सुखकाळ आपल्याबरोबर घेऊन गेला होता. फुला-आडुन डोकावणार्या तिच्या डोळ्यांमध्ये घोर चिंता दिसून येत होती
"कोण समजुन घेणार माझ्या या वेड्याला ? कोणी जपेल का याला माझ्याप्रमाणे ?" असे अनेक प्रश्न तिला पडले असावेत त्याचं मन मात्र एखादया वेड्या हरणाप्रमाने तिच्या सावलीमागे पळत होतं । ते हे मानायलाच तयार नव्हतं की, तिचं अस्तित्व आता संपलय म्हणून सावल्यांचे खेळ-आभास त्याच्या जिवनाचा एक भागच बनून गेले होते। ह्रदयात जपून ठेवलेल्या आठवणी अश्रू बनून क्षणाक्षणाला बाहेर पडत होत्या ॥
तिची प्रतिमा डोळ्यांमध्ये भरून तो जड अंतःकरणाने सायकल जवळ गेला । काकडत-काकडत त्याने सायकल घेतली व घराकडे जाऊ लागला आणि चालता चालता बेशुध्द होऊन पडला हे सर्व प्रेम होतं की वेड ॥
मी त्यावेळी हे सर्व फार जवळून बघितलं होतं ।
का? कुणीतरी इतकंही प्रेम करू शकतं?हे असं कसं प्रेम होतं ?
खरंच त्याच्या वेडेपणाला मृत्युच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या । या अगोदर तो खूपचांगला असायचा, क्षणोक्षणी त्याच्या चेहर्यावर हास्य मी कधी बघीतलेच नाही. आता त्याने आपल्या मनावर ताबा मिळवलाय, सर्वांशी बोलु शकत होता त्या वेळच्या आजारात त्याने त्याची वाचा गमावली । त्या दोघांच्याहि सुखासमोर स्वर्गसुद्धा फिका पडत असावा, म्हणून देवालाही हेवा वाटला आणि........
जे खरोखर चांगल घडत असतं, तिथेच नेमकं नशीब का तोडकं पडतं ! हा प्रश्न तर फार पूर्वीपासून अनुत्तरीतच आहे, असंच नेहमी का घडतं"फक्त तुझ्या साठी लिहिला आहे हे मी
तुझ्या वर प्रेम आहे ग माझं.